पोर्ट्रानिक्सचा योग प्लस फिटनेस ट्रॅकर

0

पोर्ट्रानिक्स कंपनीने योग प्लस हा नवीन फिटनेस ट्रॅकर भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये उपलब्ध केले आहे.

पोर्ट्रानिक्स ही कंपनी विविध उपकरणांच्या निर्मितीसाठी ख्यात आहे. याच कंपनीनेन योग प्लस हे नवीन मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. हा फिटनेस ट्रॅकर जेट ब्लॅक या रंगाच्या पर्यायात २,४९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आला आहे. हे मॉडेल युजरच्या सर्व फिटनेस अ‍ॅक्टीव्हिटीजला मॉनिटर करतांनाच त्याला त्याचे दैनंदिन रिमाइंडर्स, गोल्स आदींबाबत वारंवार स्मरण करून देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या ट्रॅकरमध्ये बाजारपेठेत उपलब्ध असणार्‍या सर्व मॉडेल्सपैकी सर्वाधीक सुलभ चार्जींगची प्रणाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. एकदा चार्ज गेल्यानंतर हा फिटनेस ट्रॅकर सात दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे मॉडेल वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्यामुळे अगदी कोणत्याही विषम वातावरणात वापरणे शक्य आहे.

योग प्लस फिटनेस ट्रॅकर हा युजरला दररोज सहा रिमाइंडर सेट करण्याची सुविधा देतो. याशिवाय, सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स, एसएमएस, मिस्ड कॉल अलर्टस आदी विविध बाबींनाही यावर दर्शविण्यात येणार आहे. व्हेरीफिट अ‍ॅपच्या मदतीने हा फिटनेस ट्रॅकर स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहे. यासाठी यात ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. यात अन्य फिटनेस ट्रॅकरप्रमाणे सर्व बाबींचे मापन करता येणार आहे. यात युजरच्या फिटनेस अ‍ॅक्टीव्हिटीजसह निद्रेच्या मापनाचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here