पोर्ट्रानिक्सचे मल्टीमिडीया हब सादर

0

पोर्ट्रानिक्स कंपनीने एमपोर्ट ४सी१ हे नवीन मल्टीमिडीया हब बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

विविध उपकरणांसाठी ख्यात असणार्‍या पोर्ट्रानिक्सने एमपोर्ट ४सी१ हे मॉडेल बाजारपेठेत २,९९० रूपये मूल्यात लाँच केले आहे. याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. हे हब फोर-इन-वन या प्रकारातील आहे. अर्थात, यामध्ये युएसबी, युसबी टाईप-सी, एचडीएमआय आणि व्हिजीए पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे एकूण चार उपकरणे एकमेकांना एकाच वेळी कनेक्ट करण्याची सुविधा मिळणार आहे. याच्या मदतीने अतिशय गतीमान आणि स्थिर पध्दतीत डाटा ट्रान्सफर करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात ओव्हर व्होल्टेज आणि ओव्हर करंटपासून संरक्षण मिळण्यासाठी इनबिल्ट प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यामुळे याला कनेक्ट असणारी उपकरणे सुरक्षित राहतात. तसेच यासाठी कोणत्याही प्रकारच्या इन्स्टॉलेशनची आवश्यकता नसल्याचेही कंपनीनी नमूद केले आहे. हे मल्टीमिडीया हब अँड्रॉइड, मॅकओएस आणि विंडोज या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here