ऑटोमेटचा स्मार्ट फॅन बाजारपेठेत दाखल

0

ऑटोमेट इंटरनॅशनल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी स्मार्टफोन कनेक्टीव्हिटी असणारा स्मार्ट फॅन सादर केला आहे.

आता सर्वच उपकरणे स्मार्ट होत आहेत. या अनुषंगाने ऑटोमेट इंटरनॅशनल या कंपनीने स्मार्ट फॅन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केला आहे. याचे मूल्य ३,९९९ रूपये असून याला देशभरातील निवडक शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा बीएलई ५.० हा प्रोसेसर दिला आहे. याच्या जोडीला डिजीटल तापमानमापक, आर्द्रता मापक आदींना इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेले आहे. यांच्या मदतीने हा पंखा भोवतालचे तापमान आणि आर्द्रतेचे अतिशय अचूक मापन करू शकतो.

वर नमूद केल्यानुसार याचे सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे याला स्मार्टफोन कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. एका अ‍ॅपच्या मदतीने हा पंखा स्माटर्र्फोनला कनेक्ट करता येणार आहे. यानंतर स्मार्टफोनवरूनच याच्या विविध फंक्शन्सचा वापर करता येणार आहे. याशिवाय, याच्या जोडीला स्मार्टमेट हे रिमोट कंट्रोलदेखील देण्यात आलेले आहे. या स्मार्ट फॅनमध्ये मॅन्युअल, ऑटो, ब्रिझ, टर्बो आणि मास्टर स्वीच आदी विविध मोडस् देण्यात आलेले आहेत. यातील मॅन्युअल मोडमध्ये युजर त्याला हव्या तितक्या वेगाने पंख्याला वापरू शकतो. ऑटो मोडमध्ये पंखा त्याच्या भोवतीच्या तापमानाचा अंदाज घेऊन याच्याशी सुसंगत वेगाने चालू शकतो. ब्रीझ मोडमध्ये हव्याच्या झुळुकीनुसार हवेचा आनंद घेता येणार आहे. टर्बो मोडमध्ये पंख्याच्या अधिकतम वेगाच्या तब्बल १० पट जास्त वेगाने पंख्याचा वापर करता येईल. तर मास्टर स्वीचच्या माध्यमातून या स्मार्ट फॅनसह ऑटोमेट कंपनीचे संबंधीत घरात असणारी अन्य उपकरणे चालू/बंद करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here