ओप्पो आर १५ प्रो सादर : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

ओप्पो कंपनीने आपला आर १५ प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून याला अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहे.

ओप्पो आर १५ प्रो या मॉडेलचे मूल्य २५,९९० रूपये आहे. यामध्ये अनेक सरस फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील डिस्प्ले हा ६.२८ इंच आकारमानाचा, नॉचयक्त, एचडी प्लस क्षमतेचा आणि ऑन-सेल ओएलईडी या प्रकारातील असून याचा अस्पेक्ट रेशो १९:९ असा आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६६० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ या प्रकारातील आहे.

ओप्पो आर १५ प्रो या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये एफ/१.७ अपर्चरयुक्त २० मेगापिक्सल्सचा एक तर दुसराही याच अपर्चरयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये २० मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून यात एआय ब्युटी हे विशेष फिचर देण्यात आलेले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा कलरओएस हा युजर इंटरफेस देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here