पॉप-अप सेल्फी कॅमेर्‍याने युक्त ओप्पो के ३ स्मार्टफोन सादर

0

ओप्पो के ३ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला असून यात पॉप-अप सेल्फी कॅमेर्‍यासह अनेक सरस फिचर्स आहेत.

अलीकडच्या काळात पॉप-अप या प्रकारातील सेल्फी कॅमेर्‍यांनी युक्त असणारे स्मार्टफोन प्रचलीत होत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने ओप्पो के ३ या मॉडेलमध्येही याच प्रकारचा कॅमेरा दिलेला आहे. याला ६ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १६,९९० आणि १९,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आले आहे. हे दोन्ही व्हेरियंट नेब्युला पर्पल, मॉर्नींग व्हाईट व सेक्रेट ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून २३ जुलैपासून उपलब्ध करण्यात येणार आहेत.

वर नमूद केल्यानुसार यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असून हा पॉप-अप या प्रकारात वर येऊन सेल्फी व व्हिडीओ कॉलींगसाठी वापरता येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यामध्ये १६ आणि २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांसा समावेश असून याच्या मदतीने दर्जेदार प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार करता, ओप्पो के ३ या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेच्या अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१० हा प्रोसेसर असून याची रॅम व स्टोअरेजचे पर्याय वर दिलेले आहेत. यात व्हिओओसी ३.० या तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३,७६५ मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलरओएस ६.० या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here