ओप्पो एफ ११ प्रो मॉडेलच्या विक्रीस प्रारंभ

0

ओप्पो कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या ओप्पो एफ ११ प्रो या मॉडेलच्या विक्रीस आजपासून प्रारंभ होत असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

ओप्पो एफ११ आणि एफ११ प्रो हे मॉडेल्स अलीकडेच भारतात लाँच करण्यात आले होते. यातील एफ११ प्रो या मॉडेलची विक्री आजपासून सुरू होत आहे. याचा पहिला सेल आजपासून प्रारंभ होत असून ग्राहक याला अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, ओप्पो ई-स्टोअर आणि कंपनीच्या देशभरातील स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य २४,९९० रूपये असून याला फ्लुरॉइड पर्पल आणि मार्बल ग्रीन या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत कंपनीने काही ऑफर्स दिल्या आहेत. यात एचडीएफसीच्या क्रेडीट वा डेबीट कार्डवरून खरेदी करणार्‍यांना ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ग्राहकाला सहा महिन्यांपर्यंत अ‍ॅक्सीडेंटल डॅमेज प्रोटेक्शन देण्यात येत आहे. इक्झीगोने हा स्मार्टफोन खरेदी करणार्‍याला एका एयर तिकिटात १ हजार तर बस तिकिटात १७५ रूपयांची सवलत जाहीर केली आहे. पेटीएमचे युजर यासोबत ३४०० रूपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. जिओच्या युजर्सला ४९०० रूपयांपर्यंतचा लाभ आणि ३.२ टेराबाईटपर्यंतचा डाटा मिळणार आहे. तर आयडीएफसीतर्फे एक वर्षाचे मोबाईल विम्याचे कव्हरदेखील युजरला मिळणार आहे.

ओप्पो एफ११ प्रो या मॉडेलमध्ये अनेक सरस फिचर्स आहेत. यातील लक्षणीय बाब म्हणजे याच्या मागील बाजूस तब्बल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याला ५ मेगापिक्सल्सच्या दुसर्‍या कॅमेर्‍याची जोड दिलेली आहे. हा ड्युअल कॅमेरा सेटअप दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ घेण्यास सक्षम असल्यामुळे हा या मॉडेलचा सेलींग पॉइंट ठरणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा पॉप-अप या प्रकारातील कॅमेरा दिलेला आहे. यात ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा (२३४० बाय १०८० पिक्सल्स ) फुल स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. यामध्ये मिडीयाटेकचा हेलीओ पी७० हा वेगवान प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. या मॉडेलमध्ये ओप्पोच्या व्हीओसीसी या फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here