वाढीव स्टोअरेजसह ओप्पो ए ५ बाजारपेठेत सादर

0
ड्युअल रिअर कॅमेरायुक्त ओप्पो ए ५, oppo a 5

ओप्पो कंपनीने आपल्या ओप्पो ए ५ या स्मार्टफोनला आता वाढीव स्टोअरेजसह ग्राहकांना सादर करण्यात आला आहे.

ओप्पो ए५ हे मॉडेल गत वर्षी सादर करण्यात आले होते. यात ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन वाढीव म्हणजेच ६४ जीबी स्टोअरेजसह सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने घोषीत केले आहे. याचे मूल्य १२,९९० रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये सादर करण्यात आले आहे.

ओप्पो ए५ या स्मार्टफोनमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा व १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅगड्रॅगन ४५० हा प्रोसेसर दिला आहे. वर नमूद केल्यानुसार याची रॅम ३ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असूनन यामध्ये यामध्ये एआय ब्युटिफाय हे फिचर दिलेले आहे.

ओप्पो ए५ स्मार्टफोनमध्ये ४,२३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १४ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारा असून यावर कलरओएस ५.१ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here