ड्युअल कॅमेर्‍यांनी युक्त ओप्पो ए ९ सादर

0

ओप्पो कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअपसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सने युक्त असणारा ओप्पो ए ९ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

ओप्पो ए ९ या स्मार्टफोनचे मूल्य १५,४९० रूपये असून याला बहुतांश शॉपींग पोर्टल्ससह देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात या माध्यमातून ओप्पोने पुन्हा एकदा मिड रेंज अर्थात मध्यम किंमतपट्टयावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. ओप्पो ए ९ या मॉडेलमध्ये ६.५३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. यावर वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉच दिलेला असून संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षण आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये मीडियाटेकचा हेलीओ पी ७० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलर ओएस ६.० या प्रणालीवर चालणारा आहे. तर यातील फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी बॅटरी ४०२० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

ओप्पो ए ९ या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला असून यात १६ आणि १२ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here