दोन व्हेरियंटमध्ये मिळणार नुबिया रेड मॅजिक ३ स्मार्टफोन

0

नुबिया रेड मॅजिक ३ हा खास गेमर्ससाठी विकसित करण्यात आलेला स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दोन व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्यात आला आहे.

नुबियाने आधीच भारतीय ग्राहकांना रेड मॅजिक हा गेमींग स्पेशल स्मार्टफोन सादर केला आहे. याचीच पुढील आवृत्ती रेड मॅजिक ३ या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोअरेज आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये ३५,९९९ आणि ४६,९९९ रूपये आहे. हे दोन्ही व्हेरियंट ग्राहकांना २७ जूनपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येतील.

रेड मॅजिक ३ या मॉडेलमध्ये लिक्वीड कुलींग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात इंटर्नल टर्बो फॅनची सुविधा दिली असून यामुळे हा स्मार्टफोन दीर्घ काळपर्यंत वापरला तरी तो तापत नाही. अर्थात, गेमर्ससाठी हे फिचर अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. यात दोन स्पीकर दिले असून यात डीटीएस एक्स आणि थ्रीडी साऊंड या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. तर फास्ट चार्जींगच्या सपोर्टने सज्ज असणारी यातील बॅटरी ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

रेड मॅजिक ३ या मॉडेलमध्ये ६.३५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा एचडीआर अमोलेड डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ४८ तर पुढे १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ९.० या आवृत्तीवर आधारित रेड मॅजिक ओएस ३.२ या प्रणालीवर चालणारा आहे. शाओमीने अलीकडेच सादर केलेल्या ब्लॅक शार्क २ या गेगिंम स्पेशल स्मार्टफोनला रेड मॅजिक ३ हे मॉडेल तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here