स्काईप कॉलमध्ये पार्श्‍वभाग अस्पष्ट करण्याची सुविधा

0

मायक्रोसॉफ्टने आपल्या स्काईप सेवेत कॉल करतांना पार्श्‍वभाग अस्पष्ट (ब्लर) करण्याची सुविधा आता युजर्सला दिली आहे.

मायक्रोसॉफ्टने याआधी मायक्रोसॉफ्ट टिम्स या ग्रुप चॅट सॉफ्टवेअरमध्ये बॅकग्राऊंडला ब्लर करण्याचे फिचर दिलेले आहे. आता हीच सुविधा स्काईप या टुलमध्ये देण्यात आलेली आहे. अनेकदा युजर हा घाई-गडबडीमध्ये कॉल करत असतो. यातच कॉलमधील त्याच्या मागचा भाग हा विसंगत वाटत असतो. यामुळे स्काईपच्या या नवीन फिचरमुळे हा पार्श्‍वभाग अस्पष्ट करता येणार आहे. यामुळे कॉलींगचा पूर्ण फोकस हा युजरवर राहणार आहे. या सुविधेसाठी कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सचा वापर करण्यात येणार आहे. यात युजरचा चेहरा आणि मागील बाजू यांच्यातील रंगसंगती लक्षात घेऊन अतिशय अचूकपणे बॅकग्राऊंड ब्लर करता येणार आहे.

डेस्कटॉप अथवा लॅपटॉपवरून स्काईप वापरणार्‍या युजर्ससाठी पार्श्‍वभाग ब्लर करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर स्मार्टफोनच्या युजर्ससाठी सध्या तरी हे फिचर उपलब्ध करण्यात आलेले नाही. यासाठी स्क्रीनच्या खाली एक स्वतंत्र बटन देण्यात आले असून यावर क्लिक करून कुणीही या फिचरचा वापर करू शकतो. मायक्रोसॉफ्टने याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये कॉलमधील बॅकग्राऊंड ब्लर करण्याची प्रक्रिया दर्शविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here