व्हाटसअ‍ॅपवर आता एक स्टीकरदेखील डाऊनलोड करता येणार

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आता आपल्या युजर्ससाठी एक स्टीकरदेखील डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

व्हाटसअ‍ॅपने अलीकडेच स्टीकर्स सादर केले असून याला अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभला आहे. याचा वापर विपुल प्रमाणात होऊ लागला आहे. यामुळे व्हाटसअ‍ॅपने यात नवनवीन सुविधा देण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने आता युजर सिंगल स्टीकरदेखील डाऊनलोड करू शकणार आहे. आजवर युजर स्टीकर्सचा पॅक डाऊनलोड करू शकत होता. आता मात्र सिंगल स्टीकरदेखील डाऊनलोड करण्याची सुविधा मिळणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या बीटा युजर्ससाठी २.१९.३३ ही नवीन आवृत्ती सादर केली आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर हेच अर्थात सिंगल स्टीकर डाऊनलोडची सुविधा असणार आहे. यात डाऊनलोड करण्यात येणार्‍या स्टीकरची साईजदेखील दिली जाणार असून ते अ‍ॅपमध्ये सेव्ह करण्याचे पर्यायदेखील दर्शविण्यात येणार आहेत. या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर व्हाटसअ‍ॅपच्या आयओएस प्रणालीसाठी असणार्‍या बीटा आवृत्तीमध्ये फेस आयडी व टच आयडी या ऑथेंटीकेशची सुविधादेखील देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here