व्हाटसअ‍ॅपचे स्टेटस् फेसबुक, इन्स्टाग्राम व जीमेलवर शेअर करण्याची सुविधा

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्सला त्याचे स्टेटस हे फेसबुक, इन्स्टाग्राम व जीमेलवर शेअर करण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले असून हे फिचर पहिल्यांदा प्रयोगात्मक स्थितीत देण्यात येणार आहे.

व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला स्टेटस अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली असून याला युजर्सकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. आता स्टेटसची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आधीच स्टेटसला फेसबुक स्टोरीजच्या स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. याची चाचणीदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. आता हे फिचर युजर्सला प्रत्यक्षात वापरण्यासाठी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात याची व्याप्ती अजून वाढविण्यात आलेली असून याबाबत द व्हर्ज या टेक पोर्टलने वृत्त प्रकाशित केले आहे. व्हाटसअ‍ॅपने आपल्या बीटा आवृत्तीच्या युजर्ससाठी एक नवीन फिचर प्रदान करण्याचे संकेत दिले आहेत. याच्या अंतर्गत आता कुणीही युजर आपले स्टेटस हे फेसबुक, इन्स्टाग्राम व जीमेलवर शेअर करू शकणार आहे. यामुळे युजर्सची एंगेजमेंट वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे व्हाटसअ‍ॅपने आता ताज्या बीटा आवृत्तीमध्ये म्युट केलेले स्टेटस हाईड करण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या अंतर्गत युजर्सने म्युट केलेले सर्व स्टेटस एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here