व्हाटसअ‍ॅप न उघडताही ऑडिओ मॅसेज ऐकता येणार

0

व्हाटसअ‍ॅपने आता नोटिफिकेशन मध्येच ऑडिओ मॅसेज ऐकण्याची सुविधा प्रदान केली असून यामुळे थेट अ‍ॅपवर जाण्याची गरज उरणार नाही.

व्हाटसअ‍ॅप आपल्या युजर्सला अनेक नवनवीन फिचर्स देत आहेत. यात आता आयओएस या प्रणालीच्या युजर्ससाठी एक नाविन्यपूर्ण फिचर देण्यात येत आहे. खरं तर आधी दिलेल्या एका फिचरचाच या माध्यमातून विस्तार करण्यात आला आहे. व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्सला नोटिफिकेशनमध्येच इमेज आणि व्हिडीओचा प्रिव्ह्यू दर्शविण्याची सुविधा दिलेली आहे. यात आता ऑडिओ मॅसेजची भर सुध्दा पडणार आहे. व्हाटसअ‍ॅपच्या सर्व आगामी फिचर्सबाबत अतिशय अचूकपणे भाकिते करणार्‍या WABetaInfo या संकेतस्थळाने ही माहिती दिलेली आहे. यानुसार आयओएस प्रणालीचे युजर्स आता नोटिफिकेशनमध्ये ऑडिओ मॅसेजचा प्रिव्ह्यू पाहून त्याला ऐकू शकणार आहेत. यामुळे कुणीही युजर अ‍ॅप न उघडताच संबंधीत ऑडिओ मॅसेजवर क्लिक करून याला ऐकू शकतो. हे फिचर पहिल्यांदा प्रयोगात्मक (बीटा) अवस्थेत देण्यात येणार असून नंतर मात्र याला सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. अर्थात, आयओएस नंतर हे फिचर अँड्रॉइड प्रणालीसाठी देण्यात येईल असेही मानले जात आहे.

दरम्यान, व्हाटसअ‍ॅपने आधीच भारतीय ग्राहकांना पेमेंट प्रणाली ही बीटा अवस्थेत वापरण्यासाठी दिली असून हे फिचर सर्व युजर्सला लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीसुध्दा समोर आली आहे. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here