स्काईपवर रिअल टाईम कॅप्शन व सबटायटल्सची सुविधा

0

स्काईप या कॉलींग सेवेवर आता युजर्सला अगदी रिअल टाईम या प्रकारात कॅप्शन तसेच सबटायटल्स देण्याची सुविधा मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्टची मालकी असणार्‍या स्काईपमध्ये अलीकडच्या काळात अनेक नवनवीन फिचर्स देण्यात येत आहेत. यात आता कॅप्शश्र आणि सबटायटल्स या दोन नवीन फिचर्सची भर पडणार असून कंपनीने याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून अधिकृत माहिती जाहीर केली आहे. हे दोन्ही फिचर्स स्काईपच्या ताज्या आवृत्तीवर वापरता येणार असून वैयक्तीक आणि सामूहिक या दोन्ही प्रकारातील कॉल्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. स्काईपवरील व्हिडीओ कॉलींगच्या माध्यमातून सहजपणे संवाद साधला जात असला तरी दिव्यांगांना यात अडचणी येत असतात. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन या दोन सुविधा देण्यात आल्या आहेत.

स्काईपवरील रिअल टाईम कॅप्शन आणि सबटायटल्सचा वापर करण्यासाठी युजरला सेटींगमध्ये आवश्यक तो बदल करावा लागणार आहे. याच्या अंतर्गत, सेटींगमध्ये जाऊन मोअर या पर्यायावर जात सबटायटल्स हा पर्याय सिलेक्ट करावा लागणार आहे. याच प्रकारे हे फिचर्स ऑफदेखील करता येणार आहे. तर सर्व कॉल्सवर हे फिचर्स डिफॉल्ट मोडवर वापरण्यासाठी युजरला सेटींग-कॉलींग-कॉल सबटायटल्स या मार्गाने जाऊन शो सबटायटल्स फॉर ऑल ऑडिओ अँड व्हिडीओ कॉल्स या पर्यायाला निवडावे लागणार आहे. स्काईपमधील हे दोन्ही फिचर्स विंडोज, अँड्रॉइड, आयओएस, लिनक्स आदी ऑपरेटींग सिस्टीम्सच्या युजर्सला वापरता येणार आहेत. दरम्यान, स्काईपवर लवकरच रिअल टाईम या प्रकारातील अनुवादाची सुविधादेखील देण्यात येणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने संकेत दिले आहेत. पहिल्या टप्प्यात २० भाषांमधील परस्पर अनुवादाची सुविधा देण्यात येणार असून नंतर यात अन्य भाषांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे भाषांच्या अथडळ्यांवर मात करून संवाद साधता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here