आता तब्बल १२ जीबी रॅम असणारा स्मार्टफोन !

0

दिवसेंदिवस स्मार्टफोनची रॅम वाढत असतांना आता लेनोव्होने तब्बल १२ जीबी इतकी रॅम असणारा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला आहे.

अलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या रॅममध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी अनेक कंपन्यांनी ८ जीबी रॅम असणारे मॉडेल्स सादर केले आहेत. तर अलीकडेच काही कंपन्यांनी १० जीबी रॅमचे स्मार्टफोन लाँच करून या स्पर्धेत आघाडी घेतली. या पार्श्‍वभूमिवर, लेनोव्होने आता तब्बल १२ जीबी रॅम असणारे झेड५ प्रो जीटी हे मॉडेल लाँच करून धमाल उडवून दिली आहे. यातील सर्वोच्च मॉडेल हे १२ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेज असणारे आहे. तर यासोबत ६ व ८ जीबी रॅम व १२८ व २५६ जीबी स्टोअरेजचे पर्यायदेखील ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

लेनोव्हो झेड५ प्रो जीटी या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ हा अतिशय वेगवान असणारा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. यातील डिस्प्ले हा ६.३९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आहे. याच्या मागील बाजूस २४ आणि १६ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. तर याच्या समोरील बाजूसही ड्युअल कॅमेरे असून यात १६ व ८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यातील बॅटरी ३३५० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय ९.० या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा झेडयुआय १०.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन पहिल्यांदा चीनमध्ये उपलब्ध करण्यात आला असून लवकरच याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here