आता वाढीव स्टोअरेजसह आलाय रिअलमी सी १ स्मार्टफोन

0

रिअलमीने आता आपला रिअलमी सी १ हा स्मार्टफोन वाढीव म्हणजेच ३२ जीबी स्टोअरेजच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केली आहे.

रिअलमी सी १ (२०१९) हे मॉडेल आता बाजारपेठेत दाखल झाले आहे. मूल रिअलमी सी १ हा स्मार्टफोन २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज या पर्यायात उपलब्ध करण्यात आला होता. मात्र रिअलमी सी १ (२०१९) हे मॉडेल वाढीव स्टोअरेजससह सादर करण्यात आले आहे. याला २ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यांचे मूल्य अनुक्रमे ७,४९९ आणि ८,४९९ रूपये आहे. हे दोन्ही व्हेरियंट ५ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या ई-स्टोअरवरून ग्राहकांना खरेदी करता येतील. तर लवकरच हे स्मार्टफोन्स ऑफलाईन पध्दतीतही मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

रिअलमी सी १ (२०१९) या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर ४५० प्रोसेसर दिला आहे. याच्या मागील बाजूस १२ आणि २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यामध्ये ४२३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here