आता लिंक्डइनवरूनही लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा

0
linkedin

लिंक्डइन या प्रोफेशनल सोशल नेटवर्कने आता आपल्या युजर्ससाठी लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा सादर केली आहे.

गत अनेक दिवसांपासून लिंक्डइन लाईव्ह स्ट्रीमिंग सेवा सुरू करणार असल्याची चर्चा सुरू होती. मध्यंतरी याबाबत चाचणी सुरू असल्याची माहितीदेखील समोर आली होती. या पार्श्‍वभूमिवर आता लिंक्डइन लाईव्ह या नावाने ही सेवा सुरू करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा फक्त अमेरिकन युजर्ससाठी लाँच करण्यात आली असली तरी लवकरच याला भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

लिंक्डइन लाईव्ह या फिचरचा उपयोग करून कुणीही युजर कार्पोरेट क्षेत्राशी संबंधीत कार्यक्रमांचे लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतो. यात विविध व्यावसायिक मिटींग्स, सेमिनार, मेळावे आदींसारख्या इव्हेंटचा समावेश आहे. अर्थात हे प्रक्षेपण संपूर्ण लिंक्डइन कम्युनिटत नव्हे तर मर्यादीत युजर्सच्या ग्रुपमध्ये प्रक्षेपीत करता येणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना एखाद्या मिटींगला बोलावण्यापेक्षा फक्त मोजक्यांना आमंत्रीत करून इतरांना याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्याची सुविधा देता येणार आहे. पहिल्या टप्प्यात युजर्सला फक्त इनव्हाईट-ओन्ली या प्रकारातून ही सेवा वापरता येणार आहे. मात्र, लवकरच याला सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे. एका अर्थाने हे प्रोफेशनल लाईव्ह स्ट्रीमिंग असेल. याला आता कसा प्रतिसाद लाभणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here