हॉटस्टारवरील प्रिमीयम व्हिडीओ ऑफलाईन पाहता येणार

0

हॉटस्टारने आपल्या युजर्ससाठी प्रिमीयम व्हिडीओ ऑफलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

हॉटस्टार ही व्हिडीओ ऑन डिमांड सेवा भारतात बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. यात मोफत आणि पेड असे कंटेंटचे दोन प्रकार आहेत. यातील मोफत व्हिडीओज हे डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा आजवर देण्यात आलेली होती. यासोबत पेड या प्रकारातील व्हिडीओजसाठीही ही सुविधा मिळावी अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. या अनुषंगाने आता हॉस्टस्टारने याच प्रकारातील सुविधा देण्याची घोषणा केली आहे. अर्थात, आता कुणीही युजर हॉटस्टारवरील प्रिमीयम व्हिडीओज डाऊनलोड करून यांना ऑफलाईन पाहू शकणार आहे. सध्या लो, मिडीयम, हाय आणि एचडी या चार प्रकारांमध्ये डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. डाऊनलोड केलेले कंटेंट हे सात दिवसानंतर अथवा युजरने याला पाहिल्यानंतर ४८ तासांनी आपोआप नष्ट होणार आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीम्ससाठी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे हॉटस्टारने जाहीर केले आहे. यासाठी युजरला हॉटस्टार अ‍ॅपचे ताजे अपडेट इन्स्टॉल करावे लागणार आहे.

यासोबत हॉटस्टारने १८:९ असा अस्पेक्ट रेशो असणार्‍या व्हिडीओजचा सपोर्टदेखील देण्याचे जाहीर केले आहे. सध्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये हाच अस्पेक्ट रेशो असणारे एज-टू-एज या प्रकारातील डिस्प्ले देण्यात येत आहेत. यामुळेच या डिस्प्लेशी सुसंगत असणारी व्हिडीओ फ्रेम पाहण्याची सुविधा यातून मिळणार आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here