आता व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी युजर्सची परवानगी आवश्यक

0

व्हाटसअ‍ॅपने आता कोणत्याही युजरला एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापूर्वी त्याची परवानगी आवश्यक करणारे फिचर कार्यान्वित केले आहे.

सध्या व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये कुणीही कुणालाही अ‍ॅड करू शकते. यामुळे बर्‍याच युजर्सला डोकेदुखी होत असते. या पार्श्‍वभूमिवर, युजरची परवानगी घेऊनच त्याला गु्रपमध्ये अ‍ॅड करता येईल अशा प्रकारच्या प्रणालीची चाचणी व्हाटसअ‍ॅपतर्फे घेण्यात आली होती. आता हे फिचर युजर्सला देण्यात येत आहे. व्हाटसअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन आवृत्ती सादर केली असून यामध्ये अद्ययावत प्रायव्हसी सेटींग प्रदान करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर अकाऊंट-प्रायव्हसी-गु्रप्स या मार्गाने जाऊन आपल्याला हवा तो पर्याय निवडू शकतो. यात कुणीही आपल्याला ग्रुपमध्ये अ‍ॅड करणार, फक्त कॉन्टॅक्ट लिस्टमधील करणार की कुणीही नाही ? या तीनपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.

या तीन पर्यायातील कुणीही नाही हा पर्याय निवडल्यास व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याची कटकट मिटणार आहे. ही सेटींग ऑन केलेल्या युजरच्या परवानगी शिवाय त्याला कुणीही ग्रुपमध्ये सहभागी करू शकणार नाही. ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी त्याची परवानगी आवश्यक राहणार आहे. हे नवीन फिचर युजर्सच्या प्रायव्हसीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. विशेष करून महिला व तरूणींना याचा खूप मोठ्या प्रमाणात होणारा त्रास मिटणार आहे. हे फिचर पहिल्या टप्प्यात निवडक युजर्सला देण्यात आले असून याला लवकरच सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here