नोकिया ८.१ स्मार्टफोनचे अनावरण

0

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ८.१ या स्मार्टफोनचे अनावरण केले असून याला दोन व्हेरियंटमध्ये बाजारपेठेत उतारण्यात येणार आहे.

गत अनेक दिवसांपासून नोकिया ८.१ या मॉडेलबाबत चर्चा सुरू होती. या पार्श्‍वभूमिवर, दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या स्मार्टफोनचे अनावरण करण्यात आले. याची मध्यपूर्वेत विक्रीपूर्व नोंदणीदेखील सुरू करण्यात आली असून हे मॉडेल लवकरच भारतात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे. या स्मार्टफोनला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये बाजारपेठेत उतारण्यात आले आहे.

नोकिया ८.१ या मॉडेलमध्ये ६.१८ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२२४६ बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:७:९ असा आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१० हा वेगवान प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत मुख्य कॅमेरा हा एफ/१.८ अपर्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशसह १२ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यात सोनी आयएमएक्स सेन्सर दिलेले आहे. तर यातील दुसरा कॅमेरा हा एफ/२.२ अपर्चर व ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनने युक्त असून १३ मेगापिक्सल्सचा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये एफ/२.२ अपर्चर आणि एलईडी फ्लॅशयुक्त २० मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये ३,४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारा आहे.

नोकिया ८.१ या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here