अमेझॉन इंडियावरून मिळणार नोकिया ६.२ स्मार्टफोन

0

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ६.२ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला असून याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीने याआधीच नोकिया ६.२ या मॉडेलचे अनावरण केले असून आता हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. याचे मूल्य १५,९९० रूपये असून याला अमेझॉन इंडिया या पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आलेले आहे. यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. यात ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा, एचडीआर १० तंत्रज्ञानाने युक्त असणारा प्युअरव्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३६ हा प्रोसेसर आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.

नोकिया ६.२च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला असून यातील प्रमुख कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा आहे. याला ८ मेगापिक्सल्सचा वाईड अँगल लेन्स व ५ मेगापिक्सल्सच्या डेप्थ सेन्सरची जोड दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here