दर्जेदार कॅमेर्‍यांनी युक्त मोटोरोला वन व्हिजन

0

मोटोरोला कंपनीने दर्जेदार कॅमेर्‍यांनी युक्त असणारा मोटोरोला वन व्हिजन हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

मोटोरोला वन व्हिजन हे मॉडेल अँड्रॉइड वन या प्रोग्रॅमच्या अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. अर्थात, यामुळे यात युजरला अन्य मॉडेल्सच्या तुलनेत अँड्रॉइडची नवीन आवृत्ती लवकरच वापरण्यास मिळणार आहे. वर नमूद केल्यानुसार यात अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यातील एक कॅमेरा हा ४८ मेगापिक्सल्सचा तर दुसरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सल्सचा आहे.

मोटोरोला वन व्हिजन या मॉडेलमधील दुसरे लक्षवेधी फिचर म्हणजे यात ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून याला १५ वॅट टर्बो चार्ज फास्ट चार्जरचा सपोर्ट दिलेला आहे. यामुळे फक्त १५ मिनिटांमध्ये ही बॅटरी सात तासांच्या बॅकअप इतके चार्जींग करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा, २१:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २५२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा सिनेमा व्हिजन या प्रकारातील एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. हा डिस्प्ले पंच होल या प्रकारातील आहे. यात एक्झीनॉस ९६०९ हा प्रोसेसर आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

मोटोरोला वन व्हिजन या मॉडेलचे मूल्य १९,९९९ रूपये असून ग्राहक याला २७ जूनपासून फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here