मोटो जी ७ मालिका सादर : अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश

0

मोटोरोलाने आपल्या मोटो जी ७ या नवीन मालिकेमध्ये जी ७, जी७ प्लस, जी ७ प्ले आणि जी ७ पॉवर हे चार नवीन मॉडेल्स सादर केले आहेत.

लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोलाने आधीच नवीन मालिका सादर करण्याचे संकेत दिले होते. या अनुषंगाने मोटो जी७ ही नवीन मालिका सादर करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत जी ७, जी७ प्लस, जी ७ प्ले आणि जी ७ पॉवर हे चार नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये एकापेक्षा एक सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व मॉडेल्समध्ये नॉचयुक्त बेझललेस डिस्प्ले दिलेला आहे. हे सर्व मॉडेल्स अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहेत. तसेच या सर्व मॉडेल्समध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३२ हा नवीन गतीमान प्रोसेसर असणार आहे.

मोटो जी ७ या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले असून यात टिअरड्रॉप या प्रकारातील नॉच दिलेला आहे. यावर जलावरोधक नॅनो कोटींग प्रदान करण्यात आली आहे. याची रॅम ४ जीबी आणि स्टोअरेज ६४ जीबी असून बॅटरी ही ३००० मिलीअँपिअर क्षमतेची असणार आहे. याच्या मागील बाजूस १२ व ५ तर पुढे ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिला आहे.

मोटो जी ७ प्लस या मॉडेलमध्ये बहुतांश फिचर्स हे जी७ या मॉडेलनुसारच आहेत. तसेच यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स व डॉल्बी ऑडिओ प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १६ व ५ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असून पुढे १२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटो जी७ पॉवर या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. याला टर्बो चार्जरचा सपोर्ट आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ६० तासांच बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. उर्वरित फिचर्समध्ये यात ६.२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी इतके असेल. यात १२ व ८ मेगापिक्सल्सचा अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेरे दिले आहेत.

मोटो जी७ प्ले हा मालिकेतील सर्वात किफायतशीर दराचा स्मार्टफोन आहे. यात ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले आहे. याची रॅम २ जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी इतके असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली आहे. यातील मुख्य कॅमेरा १२ तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे.

मोटो जी७ मालिकेतील हे सर्व स्मार्टफोन्स पहिल्यांदा ब्राझीलमध्ये मिळणार असून ते लवकरच भारतातही लाँच करण्यात येतील असे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here