दोन व्हेरियंटमध्ये मिळणार मोबीस्टारचा हा स्मार्टफोन !

0

मोबीस्टारने एक्सवन नॉच हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

मोबीस्टार कंपनीने सातत्याने किफायतशीर मूल्यात उत्तममोत्तम फिचर्सयुक्त स्मार्टफोन्स सादर करण्यास प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने एक्सवन नॉच हे मॉडेलदेखील याच प्रकारातील असून याला दोन व्हेरियंटमध्ये बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. याचे जीबी रॅम+१६ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय अनुक्रमे ८,४९९ आणि ९,४९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत रिलायन्सच्या जिओने २२०० रूपयांची सवलत देण्याचे जाहीर केले आहे.

नावातच नमूद असल्यानुसार या मॉडेलमध्ये नॉच देण्यात आलेला आहे. यातील हा नॉचयुक्त डिस्प्ले ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यामध्ये मिडियाटेकचा हेलीओ ए २२ हा प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे २ व ३ जीबी रॅमचे दोन व्हेरियंट असणार आहेत. यातील रिअल आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे प्रत्येकी १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. यातल्या फ्रंट कॅमेर्‍यात कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात एआययुक्त फिचर्सचा समावेश आहे. तर यामध्ये ३,०२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here