मॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप व इन्स्टाग्राम एकमेकांशी होणार कनेक्ट

0

फेसबुकने आपल्या मॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या तिन्ही सेवांना कनेक्ट करण्याची चाचणी पूर्ण केली असून याला लवकरच युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे.

फेसबुकने कधीपासूनच आपल्या सर्व सेवांना एकमेकांशी संलग्न करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याआधी मर्यादीत प्रमाणात फेसबुक व इन्स्टाग्रामला कनेक्ट करण्यातही आलेले आहे. तथापि, आता फेसबुक मॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या तिन्ही सेवांना कनेक्ट करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. याला फेसबुक प्रशासनाने दुजोरादेखील दिला आहे.

वास्तविक पाहता मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅप हे तिन्ही मंच जगभरात तुफान लोकप्रिय असून एक अब्जांपेक्षा जास्त युजर्स याचा वापर करत आहेत. मात्र युजर्सची एंगेजमेंट जास्त वाढण्यासाठी एकमेकांना संलग्न करण्यात येणार आहे. हे करत असतांना तिघांचे अस्तित्व स्वतंत्र राखले जाणार आहे. अर्थात, स्वतंत्र ओळखीला कोणताही धक्का लागू न देता, युजर एकातून दुसर्‍यात सहजपणे कसा कनेक्ट होईल? यावर विशेष भर दिला जाणार आहे. याची चाचणी पूर्ण करण्यात आली असून लवकरच हे फिचर युजर्सला देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here