लेनोव्होचे गुगल असिस्टंटयुक्त स्मार्ट क्लॉक

0

लेनोव्होने आता गुगल असिस्टंटचा सपोर्ट असणारे स्मार्ट क्लॉक बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

जगातील प्रत्येक घटक स्मार्ट होत असतांना याला घड्याळांचाही अपवाद नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मनगटांवरील घड्याळ हे आधीच स्मार्ट झालेले आहे. लेनोव्होने आता याच्या पुढील टप्पा गाठत मोठ्या घड्याळातही उच्च तंत्रज्ञानाने युक्त असणारी फिचर्स प्रदान केली आहेत. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे गुगल असिस्टंटचा समावेश होय. अर्थात यामुळे युजर व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. यामध्ये युजर त्याच्या दैनंदिन कामाचे नियोजन, निद्रेचे शेड्यूल, अलार्म सेटींग आदींचा समावेश आहे. हे घड्याळ अन्य उपकरणांना कनेक्ट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यातच याचा स्मार्ट स्पीकर म्हणूनही वापर करता येणार आहे. जगभरातील जवळपास एक हजार कंपन्यांनी आपल्या स्मार्ट होम उपकरणांना हे क्लॉक कनेक्ट करता येईल अशी सुविधा प्रदान केलेली आहे. या सर्वांचे नियंत्रण या उपकरणावरून करता येणार आहे.

लेनोव्होच्या या स्मार्ट क्लॉक मॉडेलच्या मागील बाजूस युएसबी चार्जर देण्यात आलेले आहे. याच्या मदतीने हे उपकरण चार्ज करता येणार आहे. यातील स्पीकर हे दर्जेदार असून यात डॉल्बीची बॅकग्राऊंड नॉईस रिडक्शन प्रणाली दिलेली आहे. हे स्मार्ट क्लॉक क्रोमकास्टलाही सपोर्ट करणारे आहे. यामुळे याच्या मदतीने टिव्हीवर विविध शोज स्ट्रीम करता येणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या मॉडेलमध्ये टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला असून याच्या मदतीने विविध फंक्शन्स वापरता येतील. लेनोव्होच्या या स्मार्ट क्लॉकचे मूल्य ७९.९९ डॉलर्स म्हणजेच सुमारे ५,६०० रूपये आहे. लवकरच भारतासह अन्य राष्ट्रांमधील ग्राहकांना याला खरेदी करता येणार आहे.

पहा :– लेनोव्होच्या स्मार्ट क्लॉकची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here