जेबीएलचा गो प्लस ब्ल्यु-टुथ स्पीकर

0

जेबीएल कंपनीने गो प्लस हा ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारा स्पीकर भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केला आहे.

हर्मन इंटरनॅशनल या सॅमसंगची उपकंपनीने आधीच भारतीय ग्राहकांसाठी जेबीएल हा ब्ल्यु-टुथ स्पीकर सादर केला असून याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता जेबीएल प्लस हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा स्पीकर आधीच्या मॉडेलचे अद्ययावत आवृत्ती आहे. यामध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा २० टक्के जास्त क्षमता असणारी बॅटरी दिलेली असून यातील ध्वनीची तीव्रतादेखील जास्त आहे. यामध्ये अतिशय उच्च नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञानाने युक्त असणारा मायक्रोफोन देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने कनेक्ट असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करता येणार आहे.

जेबीएल गो प्लस हा स्पीकर ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करता येतो. अर्थात स्मार्टफोनवरील संगीत आपण यात ऐकू शकतो. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर पाच तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात केबल इनपुटही दिलेले आहे. यामुळे याला वायरलेसच नव्हे तर वायर्ड स्पीकर म्हणूनदेखील वापरता येणार आहे. तर आकाराने अतिशय आटोपशीर असल्यामुळे याला कुठेही सहजपणे नेता येणार आहे. हा ब्ल्यु-टुथ स्पीकर ब्लॅक, ब्ल्यू आणि रेड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये १,८९९ रूपये मूल्यात अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here