इन्स्टाग्रामच्या युजर्सला डायरेक्ट मॅसेजमध्ये ध्वनी संदेश पाठविण्याची सुविधा

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्सला डायरेक्ट मॅसेजमध्ये व्हॉईस मॅसेज पाठविण्याची सुविधा आता प्रदान केली आहे.

इन्स्टाग्रामचे युजर्स आता इतरांना डायरेक्ट मॅसेज (डीएम) पाठवितांना ऑडिओ क्लीपचा वापर करू शकतात. याच्या अंतर्गत कुणीही युजर आपल्याला हव्या असणार्‍या अकाऊंटधारकाला ध्वनीफितीच्या माध्यमातून संदेश पाठवू शकणार आहे. यासाठी त्याला मायक्रोफोनच्या आयकॉनवर क्लिक करून हवा तो मॅसेज रेकॉर्ड करावा लागेल. यानंतर हा संदेश डायरेक्ट मॅसेजच्या माध्यमातून पाठवता येईल. हा संदेश पाठवण्यापूर्वी (वाटल्यास) डिलीटदेखील करण्याची सुविधा देण्यात आली आहे. व्हाटसअ‍ॅपने आधीच वैयक्तीक आणि सामूहिक पातळीवर ऑडिओ मॅसेज पाठविण्याची सुविधा दिलेली आहे. तर फेसबुक मॅसेंजरमध्येही हे फिचर आधीच देण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इन्स्टाग्रामने हे नवीन फिचर देण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इन्स्टाग्रामने अलीकडेच क्लोज्ड फ्रेंड हे वैशिष्ट्यपूर्ण फिचर युजर्सला दिले आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर हा त्याला हव्या असणार्‍या युजर्सला स्टोअरीज शेअर करू शकतो. या पाठोपाठ आता व्हॉईस मॅसेजची सुविधा देण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या स्मार्टफोन अ‍ॅपधारकांना वापरता येणार आहे. अर्थात, यासाठी युजरने आपले अ‍ॅप अपटेड करण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here