इन्फीनिक्सचा ३२ मेगापिक्सल्सच्या सेल्फी कॅमेर्‍याने युक्त स्मार्टफोन

0

इन्फीनिक्स कंपनीने तब्बल ३२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असणारा एस ४ हा कॅमेरा भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

इन्फीनिक्स कंपनीने अलीकडे भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या कंपनीने किफायतशीर मूल्यात अनेक सरस फिचर्सचा समावेश असणार्‍या मॉडेल्सला प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने नुकताच लाँच करण्यात आलेला एस ४ हा स्मार्टफोनही याच प्रकारातील आहे. याचे मूल्य ८,९९९ रूपये आहे. यात अतिशय दर्जेदार कॅमेरे आहेत. यातील फ्रंट कॅमेरा तब्बल ३२ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात एआय थ्रीडी ब्युटी फिचर देण्यात आलेले असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार सेल्फी घेता येणार आहेत. तर याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप असून यात १३, ८ आणि २ मेगापिक्सल्सच्या तीन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेच्या व्हिडीओचे चित्रीकरण करता येणार आहे. यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २६ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा असून यावर एक्सओएस ५.० हा युजर इंटरफेस देण्यात आलेला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, इन्फीनिक्स एस४ या मॉडेलमध्ये ६.२१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. यामध्ये मिडियाटेकचा हेलीओ पी २२ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here