ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी सज्ज इन्फीनिक्स हॉट ८ स्मार्टफोन

0

इन्फीनिक्सने ट्रिपल रिअर कॅमेरे आणि जंबो बॅटरीने सज्ज असणारा हॉट ८ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

इन्फीनिक्स कंपनीने थोड्या विरामानंतर भारतीय बाजारपेठेत आपले मॉडेल सादर केले आहे. इन्फीनिक्स हॉट ८ या मॉडेलचे मूल्य ७,९९९ रूपये आहे. तथापि, लाँचींगसाठी कंपनीने याला सवलतीच्या दरात म्हणजेच ६,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध केले आहे. वर नमूद केल्यानुसार याची खासियत म्हणजे या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून याला दोन मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. यात डेप्थ सेन्सर असून अंधुक उजेडातही चांगली छायाचित्रे घेण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली असून ती उत्तम बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

इन्फीनिक्स हॉट ८ मॉडेलमध्ये ६.५२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले असून यात ड्रॉप नॉच देण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here