पॉप-अप सेल्फी कॅमेर्‍यासह आलीय हुआवे वाय ९ प्राईमची नवीन आवृत्ती

0

हुआवेने पॉप-अप सेल्फी कॅमेर्‍यासह अनेक सरस फिचर्सने सज्ज असणारा हुआवे वाय ९ प्राईम (२०१९) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

अलीकडच्या काळात बर्‍याच स्मार्टफोन्समध्ये पॉप-अप या प्रकारातील सेल्फी कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. हुआवे वाय ९ प्राईम (२०१९) या मॉडेलमध्येही याच प्रकारातील फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. याची क्षमता १६ मेगापिक्सल्स इतकी आहे. तर याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला असून यात १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आहे. याला ८ मेगापिक्सल्सचा वाईड अँगल तसेच २ मेगापिक्सल्सच्या डेप्थ सेन्सर कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय उत्तम प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

हुआवे वाय ९ प्राईम (२०१९) या मॉडेलमध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या इएमयुआय ९.० या प्रणालीवर चालणारा आहे. यात ६.५९ इंच आकारमानाचा व फुल एचडी प्लस क्षमतेचा तसेच फुल स्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनचे मूल्य १५,९९० रूपये असून याला अमेझॉन इंडियासह देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here