हुआवे पी स्मार्ट (२०१९) स्मार्टफोनचे अनावरण

0

हुआवे कंपनीने आपल्या पी स्मार्ट या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती बाजारपेठेत सादर केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे

हुआवे कंपनीने याआधी पी स्मार्ट हे मॉडेल उपलब्ध केले आहे. आता याचीच पुढील आवृत्तीचे अनावरण करण्यात आले आहे. फिचर्सचा विचार केला असता या स्मार्टफोनमध्ये ६.२१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२३४० बाय १०८० पिक्सल्स ) डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १९:५:९ असा आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर किरिन ७१० हा अतिशय गतिमान असणारा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी आहे. हे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आलेला आहे. यातील एक कॅमेरा १२ मेगापिक्सल तर दुसरा २ मेगापिक्सल क्षमतेचा असणार आहे. या कॅमेर्‍यांमध्ये पीडीएएफ, फेस रेकग्निशन, पोर्ट्रेट मोड आणि एलईडी फ्लॅश आधी फीचर्स प्रदान करण्यात आलेले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी यामध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ३४०० मिली अँपियर क्षमतेची बॅटरी असून ती अतिशय उत्तम दर्जाचा बॅकअप देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ९.० पाय आवृत्ती वर चालणारा असून यावर कंपनीचा एमयुआय ९.० हा युजर इंटरफेस प्रदान करण्यात आलेला आहे. हे मॉडेल पहिल्यांदा ब्रिटनमध्ये मिळणार असून ते लवकरच भारतासह अन्य देशांमध्ये उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here