हुआवे मेट २० प्रो सादर : जाणून घ्या सर्व फिचर्स

0
हुआवे मेट प्रो, huawei mate pro

हुआवेने हुआवे मेट २० प्रो हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला असून याला अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहे.

हुआवे कंपनीने अलीकडेच लंडन शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हुआवे मेट प्रो या मॉडेलला लाँच केले आहे. पहिल्यांदा हा स्मार्टफोन मोजक्या राष्ट्रांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तर भारतात हे मॉडेल आज लाँच करण्यात आले आहे. याचे मूल्य ६९९९० रूपये असून ग्राहक याला ४ डिसेंबरपासून अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतील. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील प्राथमिक कॅमेरा हा ४० मेगापिक्सल्सचा आहे. तर उर्वरित दोन्ही कॅमेरे हे २० आणि ८ मेगापिक्सल्सचे आहेत. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रीत माध्यमातून हा कॅमेरा अतिशय सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेण्यास सक्षम असल्याचा दावा हुआवे कंपनीतर्फे करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

हुआवे मेट प्रो या मॉडेलमध्ये ६.३९ इंच आकारमानाचा आणि क्वॉड एचडी प्लस म्हणजेच ३१२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १५:५:९ असा आहे. यामध्ये किरीन ९८० हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी असून ते नॅनो मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यात इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आलेले आहे. यामध्ये आयफोन-एक्सप्रमाणे फेसियल रिकग्नीशन प्रणालीदेखील दिलेली आहे. यातील बॅटरी ९,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइड ९.० पाई या आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here