हुआवे मेट २० प्रो स्मार्टफोनच्या विक्रीस प्रारंभ

0
हुआवे मेट प्रो, huawei mate pro

हुआवे कंपनीने अलीकडेच लाँच केलेल्या मेट २० प्रो या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनच्या विक्रीस आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

हुआवे मेट २० प्रो या मॉडेलला अलीकडेच भारतीय ग्राहकांसाठी लाँच करण्याची घोषणा करण्यात आली होती. आजपासून हा स्मार्टफोन ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याचे मूल्य ६९९९० रूपये असून ग्राहक याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतील. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील प्राथमिक कॅमेरा हा ४० मेगापिक्सल्सचा आहे. तर उर्वरित दोन्ही कॅमेरे हे २० आणि ८ मेगापिक्सल्सचे आहेत. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रीत माध्यमातून हा कॅमेरा अतिशय सजीव वाटणार्या प्रतिमा घेण्यास सक्षम असल्याचा दावा हुआवे कंपनीतर्फे करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

हुआवे मेट प्रो या मॉडेलमध्ये ६.३९ इंच आकारमानाचा आणि क्वॉड एचडी प्लस म्हणजेच ३१२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १५:५:९ असा आहे. यामध्ये किरीन ९८० हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी असून ते नॅनो मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यात इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आलेले आहे. यामध्ये आयफोन-एक्सप्रमाणे फेसियल रिकग्नीशन प्रणालीदेखील दिलेली आहे. यातील बॅटरी ९,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइड ९.० पाई या आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here