एआय ड्युअल कॅमेर्‍यांनी युक्त येणार हुआवेचा ‘हा’ स्मार्टफोन

0

हुआवेने एआय ड्युअल कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा वाय ७ प्रो (२०१९) या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे.

गत अनेक दिवसांपासून हुआवे वाय ७ प्रो या मॉडेलची नवीन आवृत्ती येणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर शिक्कामोर्तब करत वाय ७ प्रो (२०१९) या मॉडेलचे अनावरण करण्यात आले आहे. वर नमूद केल्यानुसार यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे एआय (आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स) तंत्रज्ञानाने युक्त असणारा ड्युअल कॅमेरा सेटअप होय. याच्या अंतर्गत एफ/१.८ अपर्चरयुक्त १३ मेगापिक्सल्स आणि एफ/२.४ अपर्चरयुक्त २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यामध्ये कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशीयल इंटिलेजीयन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने फेस अनलॉक फिचरचा वापरदेखील करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, हुआवे वाय ७ प्रो (२०१९) या मॉडेलमध्ये ६.२६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण दिलेले आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविता येणार आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारे असून यावर इएमयुआय ८.२ हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तर यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन पहिल्यांदा इंडोनेशियात उपलब्ध करण्यात आला असून याला लवकरच भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here