नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात मिळणार ऑनर ८ एक्स !

0

ऑनरने आपला ८ एक्स हा स्मार्टफोन नवीन रंगाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने अलीकडेच ऑनर ८ एक्स हे मॉडेल ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायात उपलब्ध केले होते. आता या स्मार्टफोनला रेड या आकर्षक रंगाच्या पर्यायात सादर करण्यात आले आहे. हे व्हेरियंट अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. याला ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज (मूल्य १४,९९९); ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज (मूल्य १६,९९९) आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज (मूल्य १८९९९) अशा तीन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

ऑनर ८एक्स या मॉडेलमध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले तब्बल ६.५ इंच आकारमानाचा असून फुल एचडी प्लस या क्षमतेचा आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशो १५:५:९ असा असून याच्या वरील भागात नॉच प्रदान करण्यात आला आहे. हा जगातील प्रथम टियुव्ही-र्‍हाईनलँड सर्टीफाईड डिस्प्ले असून याच्यामुळे युजर्सच्या डोळ्यांवर ताण येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच यामध्ये आय-कंफर्ट मोडदेखील देण्यात आलेला आहे. यात ऑक्टा-कोअर हायसिलीकॉन ७१० प्रोसेसर देण्यात आलेला आहे. तर वर नमूद केल्यानुसार याचे तीन व्हेरियंट उपलब्ध करण्यात आले आहेत.

ऑनर ८एक्स मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. याच्या अंतर्गत एफ/१.८ अपर्चरयुक्त २० मेगापिक्सल्सचा एक तर २ मेगापिक्सल्स क्षमतेचा डेफ्थ-ऑफ-फिल्ड या प्रकारातील दुसरा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यांमध्ये कृत्रीम बुध्दीमत्तायुक्त फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये नाईट शुटींग मोड, मल्टी-सीन रिकग्नीशन, पोर्ट्रेट मोड आणि एआय ब्युटी इफेक्ट आदींचा समावेश आहे. यात एआय शॉपींग फिचर दिलेले आहे. याच्या मदतीने कुणीही स्मार्टफोनचा कॅमेरा संबंधीत वस्तूवर फिरवल्यावर त्याला विविध शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतो. यात ३,७५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर आधारित इएमयुआय ८.२ या प्रणालीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here