नोकिया ६.१ स्मार्टफोनच्या मूल्यात घसघशीत कपात

0

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ६.१ या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा घसघशीत कपात करण्याची घोषणा केली आहे.

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने गत एप्रिल महिन्यात नोकिया ६.१ हा स्मार्टफोन लाँच केला होता. याला ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज तसेच ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज या दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १६,९९९ आणि १७,४९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले होते. याच्या मुल्यात दोनदा कपात करण्यात आली होती. यात पुन्हा कपात करण्यात आली असून हे दोन्ही मॉडेल्स अनुक्रमे ६,९९९ आणि ९,९९९ रूपये मुल्यांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एचएमडी ग्लोबलने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

नोकिया ६.१ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३० प्रोसेसर आहे. याच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. यातील मुख्य कॅमेरा १६ ते सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या प्रणालीवर चालणारे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here