हाईक मॅसेंजरवर ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साठी विशेष स्टीकर्स

0

हाईक मॅसेंजरने आपल्या युजर्ससाठी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्त विशेष स्टीकर्सचा पॅक सादर केला असून याला डाऊनलोड करून वापरता येणार आहे.

हाईक या स्वदेशी मॅसेंजरला युजर्सची चांगली पसंती मिळाली आहे. व्हाटसअ‍ॅपच्या तुलनेत याच्या युजर्सची संख्या बरीच कमी असली तरी यात सातत्याने वाढ होत आहे. यावर अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यात युजर्सला स्टीकर्स हे भलतेच भावले आहेत. अलीकडेच याची व्हाटसअ‍ॅपने कॉपीदेखील केली आहे. हाईक मॅसेंजरवर हजारो स्टीकर्स उपलब्ध आहेत. यात आता ‘व्हॅलेंटाईन्स डे’ निमित्त नवीन पॅक्सची भर पडणार आहे. आता हाईकने यासाठी स्टीकर्सचा खास संच उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये लव्ह, हार्ट, टेडी बियर्स आदींसह अन्य स्टीकर्सचा समावेश आहे. खरं तर ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या अनुषंगाने साजर्‍या करण्यात येणार्‍या सर्व दिवसांसाठी हे स्टीकर्स सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात एलजीबीटीक्यू या समुदायासाठीही स्टीकर देण्यात आलेले आहे.

हाईक मॅसेंजरने हे स्टीकर्स पॅक अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीम्सच्या युजर्ससाठी सादर केले आहेत. यांना गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करून वापरता येणार असल्याची माहिती हाईकतर्फे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here