हॅथवेचा अँड्रॉइड सेट टॉप बॉक्स सादर

0

हॅथवे या केबल सेवा पुरवठादार कंपनीने प्ले बॉक्स या नावाने नवीन अँड्रॉइड सेट टॉप बॉक्स बाजारपेठेत सादर केला आहे.

हॅथवे कंपनीने गत काही महिन्यांपासून आपल्या सेवांचा विस्तार करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहेत. या अनुषंगाने अलीकडेच अल्ट्रा स्मार्ट हब या नावाने सेट टॉप बॉक्स लाँच केला होता. यासोबत आता प्ले बॉक्स हा नवीन अँड्रॉइड सेट टॉप बॉक्स लाँच करण्यात आलेला आहे. नावातच नमूद असल्यानुसार याच्या मदतीने कुणीही युजर हा आपल्या टिव्हीवर अँड्रॉइड प्रणालीचा आनंद घेऊ शकणार आहे. याला कोणत्याही टिव्हीला अटॅच केल्यानंतर त्या मॉडेलवर गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून विविध अ‍ॅप्स इन्स्टॉल करून वापरणे शक्य होणार आहे. याच्या मदतीने नेटफ्लिक्स, युट्युब आदींसारख्या लोकप्रिय सेवांचा आनंद टिव्हीच्या डिस्प्लेवरून मिळवता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याचा वापर करून टिव्हीवर गेमिंगही करता येणार आहे. अलीकडच्या काळात गेमिंगची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून ही सुविधा गेमर्ससाठी अतिशय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. यात गेमिंगच्या स्ट्रीमिंगसह अन्य युजरला सहभागी करून घेण्याची सुविधादेखील मिळणार आहे.

हॅथवे कंपनीचा हा सेट टॉप बॉक्स २,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आलेला आहे. ग्राहक याला प्रत्यक्षात दोन आठवड्यांमध्ये खरेदी करू शकणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here