गोक्वी रन जीपीएस फिटनेस ट्रॅकर दाखल

0

गोक्वी कंपनीने रन जीपीएस हा नवीन फिटनेस ट्रॅकर भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

भारतीय बाजारपेठेत सध्या फिटनेस ट्रॅकर्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. या अनुषंगाने गोक्वी कंपनीने रन जीपीएस हे नवीन मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. नावातच नमूद असल्यानुसार या मॉडेलमध्ये जीपीएसची सुविधा देण्यात आलेली आहे. यात अन्य फिटनेस ट्रॅकर्समधील सर्व फिचर्स देण्यात आलेले आहेत. म्हणजेच कुणीही याच्या मदतीने आपल्या शारिरीक हालचालींवर लक्ष ठेवू शकतो. यात चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज, निद्रेचे मापन आदींचा समावेश आहे. यासोबत यात धावण्याशी संबंधीत काही नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या फिटनेस ट्रॅकरच्या युजर्सला गोक्वी प्ले या मंचावरून मॅरेथानसह अन्य धावण्याच्या शर्यतीसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून सल्ला मिळणार आहे. यासाठी गोक्वी कंपनीने विविध तज्ज्ञ प्रशिक्षकांसोबत करार केलेला आहे.

गोक्वी रन जीपीएस फिटनेस ट्रॅकर हा अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहे. यासाठी कंपनीने अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी स्वतंत्र अ‍ॅप विकसित केले आहे. यामध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल सात दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला युएसबीच्या मदतीने चार्ज करता येणार आहे. या फिटनेस ट्रॅकरचे मूल्य ४,९९९ रूपये असून ग्राहक याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here