गुगल मॅप्सवर येणार ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीयुक्त फिचर

0
गुगल मॅप्स, google maps

गुगल मॅप्सवर लवकरच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी अर्थात विस्तारीत सत्यतेचा सपोर्ट येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

गुगलने गत वर्षीच्या आय/ओ परिषदेत गुगल मॅप्समध्ये विस्तारीत सत्यतेचा सपोर्ट येणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर अनेक महिने उलटूनही याबाबत घोषणा करण्यात आली नव्हती. आता मात्र लवकरच हे फिचर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला आहे. यानुसार गुगल मॅप्सवर एआर म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीने युक्त असणारे फिचर देण्यात येणार आहे. हे फिचर नेमके कोणते आणि ते कसे काम करणार? याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, याच्या मदतीने गुगल मॅप्सवर फ्लोटींग थ्रीडी चिन्ह दिसणार आहेत. यामुळे कोणत्याही दिशेला कॅमेरा धरल्यानंतर युजरला त्या दिशेचे लोकेशन्स दिसतील. अर्थात यामुळे नेव्हिगेशन करतांना विविध बाबींचे आकलन हे अधिक सुलभ पध्दतीत होणार असल्याचे या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात हे फिचर मोजक्या युजर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याचे या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर मात्र हे सर्व युजर्सला वापरता येणार आहे. यासाठी युजरचा कॅमेरा आणि जीपीएस लोकेशनचा वापर करण्यात येणार आहे. या फिचरबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here