गुगल मॅप्सवर आता स्पीडोमीटरची सुविधा

0

गुगलने आपल्या मॅप्समध्ये स्पीडोमीटरची सुविधा दिली असून पहिल्या टप्प्यात याला अँड्रॉइड युजर्स वापरू शकणार आहेत.

गुगल मॅप्सने आधीच स्पीड लिमिट हे फिचर युजरला दिलेले आहे. यानंतर गत सुमारे दोन वर्षांपासून स्पीडोमीटर या फिचरची चाचणी घेतली जात होती. आता हेच फिचर जगभरातील ४० देशांमधील युजर्सला सादर करण्यात आले असून यात भारताचा समावेश आहे. हे फिचर अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्सला अपडेटच्या माध्यमातून वापरण्यासाठी मिळेल. यानंतर आयओएससाठी याला सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

नावातच नमूद असल्यानुसार स्पीडोमीटर या सुविधेच्या माध्यमातून गुगल मॅप्सच्या युजरला आपल्या वाहनाचा वेग कळू शकणार आहे. नियमापेक्षा जास्त वेगाने संबंधीत वाहन धावत असल्यास युजरला याबाबत अलर्ट मिळेल. हा अलर्ट लाल रंगाच्या माध्यमातून त्याला समजेल. हा अलर्ट डिस्प्लेच्या खालील बाजूस दिसेल. यासाठी युजरला आपल्या सेटींगमध्ये जाऊन मॅन्युअल पध्दतीत स्पीडोमीटरचा पर्याय ऑन करावा लागणार आहे. युजरला मर्यादेपेक्षा जास्त वेगाने ड्राईव्ह टाळण्यासाठी हे फिचर अतिशय उपयुक्त ठरू शकते. ही माहिती जीपीएस व इंटरनेटच्या वेगावर आधारित आहे. यामुळे ही माहिती अगदीच रिअल टाईम या प्रकारातील नसेल असे गुगलने नमूद केले आहे.

स्पीडोमीटरच्या जोडीला गुगल मॅप्सने नवीन नेव्हिगेशनची सुविधा प्रदान केली आहे. याच्या अंतर्गत वाहनचालकाला त्याच्या मार्गावरील नैसर्गिक आपत्तींचा माहिती मिळणार असून यातून कोणचा मार्ग टाळावा हेदेखील सूचित केले जाणार आहे. गुगल मॅप्सवर आधीच असणार्‍या एसओएस या फिचरचा विस्तार करून ही नवीन सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here