जिओफोनला टक्कर देणार गुगलचा हा फिचरफोन !

0

जिओफोनला टक्कर देण्यासाठी गुगलने कायओएसच्या मदतीने विझफोन डब्ल्यूपी००६ हा फिचरफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

रिलायन्सच्या जिओ सेवेने जिओफोनला भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून याला अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभला आहे. याची दुसरी आवृत्तीदेखील बाजारपेठेत अतिशय लोकप्रिय झालेली आहे. जिओफोनला आव्हान देण्यासाठी अनेक कंपन्यांनी प्रयत्न केले असले तरी यात कुणीही यशस्वी झालेला नाही. या पार्श्‍वभूमिवर, आता गुगल कंपनीनेच विझफोन डब्ल्यूपी००६ हा फिचरफोन नुकताच इंडोनेशियात सादर केला असून हे मॉडेल भारतात आल्यानंतर जिओफोनला तगडे आव्हान देण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गुगलने कायओएस या ऑपरेटींग सिस्टीमच्या मदतीने हा फिचरफोन तयार करण्यात आलेला आहे. कायओएस ही ऑपरेटींग सिस्टीम भारतीय कंपनीने विकसित केलेली आहे. जिओफोनदेखील कायओएसवरच चालणारा आहे. सध्या कायओएस ही भारतात अँड्रॉइडनंतर सर्वाधीक वापरली जाणारी ऑपरेटींग सिस्टीम आहे. याबाबत कायओएसने अ‍ॅपलच्या आयओएसला मागे टाकल्याची बाब लक्षणीय आहे.

विझफोन डब्ल्यूपी००६ या मॉडेलमध्ये फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट आहे. जिओफोनमध्येही याच प्रकारचा सपोर्ट असल्यामुळे ग्राहकांची याला मोठी पसंती मिळाली आहे. हा स्मार्टफोन सुमारे पाचशे रूपये मूल्यात भारतात लाँच होऊ शकतो. असे झाल्यास जिओफोनला मोठे आव्हान उभे राहू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here