बच्चे कंपनीसाठी गुगलचे बोलो अ‍ॅप

0

गुगलने खास बालकांसाठी बोलो हे अ‍ॅप सादर केले असून या माध्यमातून त्यांचे वाचन कौशल्य वृध्दीस मदत होणार आहे.

गुगलने आपले बोलो हे अ‍ॅप सादर केले असून यात सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. अर्थात विद्यार्थी या दोन्ही भाषांमधील वाचन कौशल्य यातून वाढवू शकतात. यामध्ये गुगलने विकसित केलेल्या टेक्स्ट-टू-स्पीच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात दिया हा असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आलेला आहे. हा असिस्टंट विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरीत करून सहाय्यदेखील करतो. यात मुलांसाठी गोष्टी, गेम्स आदी बाबीदेखील देण्यात आलेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे हे अ‍ॅप ऑफलाईन अर्थात इंटरनेटविनादेखील वापरता येते. तसेच यात जाहिरातीदेखील दिलेल्या नसून याचा युजर इंटरफेस हा अतिशय सुलभ असाच आहे. या अ‍ॅपच्या मदतीने एकाच वेळी अनेक विद्यार्थी त्यांच्या अ‍ॅक्टीव्हिटीज ट्रॅक करू शकतात. आणि यातून युजरची वैयक्तीक माहिती जमा करण्यात येत नसल्याचे गुगलने नमूद केले आहे.

गुगलच्या बोलो अ‍ॅपला उत्तरप्रदेशातील २०० खेड्यांमध्ये बीटा अर्थात प्रयोगात्मक अवस्थेत वापरण्यात आले आहे. यानंतर आलेल्या सूचनांनुसार बदल करून याला आता सर्व युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here