आपल्या ऑनलाईन खरेदीवर गुगलची आहे नजर !

0

गुगल युजर्सच्या ऑनलाईन खरेदीवर जीमेलच्या माध्यमातून नजर ठेवून असल्याची माहिती समोर आली असल्याची माहिती समोर आली आहे.

आपली ऑनलाईन मुशाफिरी ही आपल्याबाबतची सर्वांगीण माहिती टेक कंपन्यांना देत असते ही बाब आधीच सिध्द झालेली आहे. यात काही कंपन्या जाणीवपूर्वक माहिती जमा करून संबंधीत युजर्सला टार्गेटेड जाहिराती दाखवत असल्याचेही आधी दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, सीएनबीसी या वृत्तसंस्थेने गुगलबाबत एक गौप्यस्फोट केल्याने हा विषय नव्याने चर्चेत आला आहे. गुगलने आपल्या जीमेल या ई-मेल सेवांच्या युजर्सची माहिती जमा करून आपण जाहिरात दाखवत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. तथापि, हा ताजा गौप्यस्फोट याच्या अगदी विरूध्द बाजू दर्शविणारा आहे.

गुगलने आपल्या प्रत्येक युजरला त्याने ऑनलाईन खरेदी केलेल्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी एक टुल दिलेले आहे. https://myaccount.google.com/purchases या युआरएलवर क्लिक करून कुणीही आपल्या आजवरच्या खरेदीची रेकॉर्ड एकाच ठिकाणी पाहू शकतो. यात संबंधीत युजर ज्या दिवसापासून जीमेलचा वापर करतोय त्या दिवसापासूनची सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्यात आलेली आहे. यातील माहितीच्याच आधारे गुगल त्या युजरला जाहिराती दाखवत असल्याची माहिती समोर आली असून सीएनबीसीच्या वृत्तात याचाच संदर्भ घेण्यात आलेला आहे. तथापि, गुगलने पुन्हा एकदा आपण या माहितीचा वापर जाहिरातींसाठी करत नसल्याचा पुनरूच्चार केला आहे. अर्थात, युजर्सच्या गोपनीयतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here