गुगल ड्युओने पार केला एक अब्ज डाऊनलोडचा टप्पा

0
ड्युओ, google duo

गुगलच्या ड्युओ हा व्हिडीओ चॅट अ‍ॅपने एक अब्ज डाऊनलोडचा महत्वाचा टप्पा पार केला असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

गुगलने २०१६ साली अ‍ॅलो या मॅसेंजरसह ड्युओ हे व्हिडीओ चॅट अ‍ॅप सादर केले होते. यातील अ‍ॅलो या मॅसेंजरला फारशी लोकप्रियता लाभली नाही. मध्यंतरी तर अ‍ॅलो बंद पडणार असल्याची आवईदेखील उठली होती. दरम्यान, असे असले तरी ड्युओ अ‍ॅपला युजर्सची पसंती मिळाली. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ड्युओ अ‍ॅपने ५० लक्ष डाऊनलोडचा टप्पा पार केला होता. यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच उर्वरित ५० लक्ष डाऊनलोड झाले आहेत. अर्थात, ड्युओ अ‍ॅपचे एकूण १०० कोटींच्या वर डाऊनलोड झाले असून गुगलतर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

ड्युओ अ‍ॅपने एक अब्ज डाऊनलोडच्या माध्यमातून गाठलेला हा टप्पा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. एक अब्जापेक्षा जास्त डाऊनलोड झालेल्या अ‍ॅप्सच्या यादीत गुगल आणि फेसबुकची मालकी असणार्‍या विविध सेवांचा समावेश आहे. तथापि, गुगलने खूप प्रयत्न करूनदेखील सोशल मीडियातील फेसबुकची मक्तेदारी अद्याप गुगलला मोडून काढता आलेली नाही. मात्र गुगल सर्च आणि युट्युबसारख्या सेवांनी गुगलला जोरदार आगेकूच करण्यासाठी मदत केली आहे. यातच आता ड्युओ अ‍ॅपने गाठलेला टप्पा हा या कंपनीला उभारी देणारा मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here