जीमेलच्या अँड्रॉइड अ‍ॅपवर डार्क मोडची सुविधा

0

जीमेलने आपल्या अँड्रॉइड अ‍ॅपच्या युजर्ससाठी डार्क मोडची सुविधा देण्याचे संकेत दिले असून यासाठी नवीन अपडेट सादर करण्यात आले आहे.

गुगलने या वर्षाच्या प्रारंभी जीमेलच्या अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालीच्या अ‍ॅपसाठी नवीन ले-आऊट सादर केला होता. यात मटेरियल डिझाईन या संकल्पनेवर आधारित नवीन रंगसंगती प्रदान करण्यात आली होती. यात प्रामुख्याने पांढर्‍या रंगाला प्राधान्य दिलेले होते. आता जीमेलवर डार्क थीम येणार असल्याचे स्पष्ट झाले असून काही युजर्सला हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. जीमेलचे व्ही२०१९.०६.०९ हे नवीन अपडेट अँड्रॉइड युजर्सला सादर करण्यात आले असून यात डार्क थीम देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण अ‍ॅपमध्ये नव्हे तर सेटींगच्या विभागात हा मोड प्रदान करण्यात आलेला आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मते लवकरच संपूर्ण अ‍ॅपसाठी ही सुविधा सादर करण्यात येईल याची शक्यता आहे.

अलीकडच्या कालखंडात बहुतेक अ‍ॅप्सने आपल्या युजर्ससाठी डार्क मोडची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने डोळ्यांना त्रास न होता अ‍ॅप वापरता येत असल्यामुळे युजर्सची याला पसंती मिळाले आहे. यामुळे आता जीमेलवरही ही सुविधा मिळणार असून ताज्या अपडेटमध्ये याची चुणूक मिळाल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here