पतंजलीच्या किंभो अ‍ॅपचा फियास्को; पुनरागमनाची शक्यता धुसर

0

पतंजलीने मोठा गाजावाजा करून सादर केलेल्या किंभो अ‍ॅपच्या पुनरागमनाची शक्यता धुसर बनली असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळाले आहेत.

बाबा रामदेव याच्या पतंजली समूहाने विविध उत्पादनांच्या माध्यमातून यशोशिखर गाठले आहे. याच प्रकारे २०१८च्या मध्यावर पतंजलीने किंभो या नावाने मॅसेंजर लाँच करून धमाल उडवून दिली होती. आपले हे अ‍ॅप थेट व्हाटसअ‍ॅपला तगडे आव्हान उभे करणार असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केल्यामुळे किंभोने सर्वांचे लक्ष आकृष्ट करून घेतले होते. मात्र गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप सादर केल्यानंतर याला लागलीच हटविण्यात आले होते. यात सुरक्षाविषयक त्रुटी असल्यामुळे गुगलने याला हटविल्याचे कारण त्यावेळी सांगण्यात आले होते. या त्रुटींची पूर्तता करून किंभो अ‍ॅप नव्याने सादर करण्यात येणार असल्याचे पतंजलीतर्फे सांगण्यात आले होते. यानंतर याला जुलै महिन्यात बोलो मॅसेंजर या नावाने नव्याने दाखल करण्यात आले. मात्र बोलो मॅसेंजरला विकसित करणार्‍या आदिती कमल यांच्यासोबत पतंजलीचे वाद झाल्याची माहिती समोर आली. यामुळे किंभो अ‍ॅपलाच ऑगस्ट अखेरीस नवीन स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याची माहिती पतंजलीतर्फे देण्यात आली. यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा हे अ‍ॅप पुनरागमन करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तथापि, असे काहीही झाले नाही. यातच आता हे वर्ष संपत आले तरी याबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे हे अ‍ॅप पुनरागमन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

किंभो अ‍ॅपचे पुनरागमन होणार नसल्याची बाब आता उघड झाली आहे. यामुळे बाबा रामदेव यांच्या मॅसेंजरचा फियास्को झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here