फास्ट्रॅकचा नवीन फिटनेस बँड दाखल

0

फास्ट्रॅकने भारतीय ग्राहकांसाठी आपला रिफ्लेक्स एब्ल्यूएव्ही हा नवीन फिटनेस बँड सादर केला असून हे जागातील सर्वात स्लीम मॉडेल आहे.

वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांच्या क्षेत्रामध्ये फास्ट्रॅक कंपनी ख्यातप्राप्त मानली जाते. या कंपनीने रिफ्लेक्स डब्ल्यूव्ही हा नवीन फिटनेस बँड भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. याचे मूल्य ४,९९५ रूपये इतके आहे. याची खासियत म्हणजे या मॉडेलची डिझाईन ही अतिशय आकर्षक असून ते आकाराने अतिशय स्लीम आहे. कंपनीने तर हा जगातील सर्वात स्लीम फिटनेस बँड असल्याचा दावा केला आहे. हा फिटनेस बँड वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ असल्यामुळे कोणत्याही वातावरणात अगदी सहजपणे वापरणे शक्य आहे. यात अतिशय नाविन्यपूर्ण असे जेस्चर कंट्रोल हे फिचरदेखील देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत कुणीही आपले फक्त मनगट हलवून म्युझिक ट्रॅक बदलणे, छायाचित्र घेणे, कॉल रिजेक्ट करणे, नोटिफिकेशन्सवरून नजर फिरवणे आदी कामे पार पाडू शकतो.

फास्ट्रॅकच्या या फिटनेस बँडमध्ये ओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅक करण्याच्या सर्व सुविधा आहेत. यामध्ये कुणीही चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज आदींसह निद्रेचे मापन करू शकतो. याला स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here