फेसबुकतर्फे लिब्रा आभासी चलनाची घोषणा

0

प्रचंड उत्सुकता लागून असणार्‍या फेसबुकच्या लिब्रा या आभासी चलनाची (क्रिप्टोकरन्सी) अखेर घोषणा करण्यात आली असून लवकरच याला सादर करण्यात येणार आहे.

फेसबुक आपले स्वतंत्र आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) आणणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. यावर आता अखेर शिक्कामोर्तब झाले असून फेसबुकने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली आहे. लिब्रा नेटवर्कच्या अंतर्गत फेसबुक आपली डिजीटल करन्सी प्रणाली आणत आहे. यात लिब्रा हे आभासी चलन सादर करण्यात येणार आहे. तर याच्या सुरक्षित देवाण-घेवाणीसाठी कॅलीब्रा हे डिजीटल वॅलेटदेखील लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याच्या जोडीला आभासी चलनाच्या प्रचार-प्रसारासाठी लिब्रा फाऊंडेशनची स्थापनादेखील करण्यात आली आहे.

आधीच बीटकॉईन्ससह अनेक आभासी चलन जागतीक पातळीवर उपलब्ध असतांना फेसबुकने लिब्राची केलेली घोषणा ही या क्षेत्रात आता प्रचंड चुरस निर्माण होणार असल्याचे संकेत देणारी आहे. लिब्रा हे स्वतंत्र अ‍ॅपच्या माध्यमातून सादर करण्यात येणार असून याच्या जोडीला फेसबुक मॅसेंजर व व्हाटसअ‍ॅपवरही याला उपलब्ध करण्यात येणार आहे. अगदी टेक्स्ट मॅसेजच्या देवाण-घेवाणीप्रमाणे म्हणजे सुलभ पध्दतीत याचा वापर करता येणार आहे. तर याचे सर्व व्यवहार हे कॅलीब्राच्या माध्यमातून केले जाणार आहेत. यावरून अतिशय सुलभ आणि सुरक्षित व्यवहार करता येतील. युजरची गोपनीयता कायम राखत अभेद्य सुरक्षा कवचासह फेसबुकने क्रिप्टोकरन्सी लाँच केली आहे. साधारणत: वर्षभरात पहिल्यांदा व्हाटसअ‍ॅपवर लिब्रा सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here